Lalbaugcha Raja 2024 : लालबागचा राजा मयूर महालात विराजमान | Ganeshotsav 2024

महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव, वर्षभर ज्या क्षणाची वाट पाहात लाखो भक्तगण हे वर्ष घालवतात तो हर्षाचा क्षण म्हणजे बाप्पाचं भक्तांच्या भेटीला येण.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव, वर्षभर ज्या क्षणाची वाट पाहात लाखो भक्तगण हे वर्ष घालवतात तो हर्षाचा क्षण म्हणजे बाप्पाचं भक्तांच्या भेटीला येण. माहेरघर असलेल्या लालबाग परळमध्ये तर गणेशभक्तांचा जनसागर उसळेला आहे. जगभरातील गणेशभक्तांचा आराध्यदैवत असलेल्या लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येत भक्तजन पाहायला मिळत आहेत.

यंदा लालबागच्या राज्याचा दरबार हा मयूर महालात आहे. तसेच लालबागचा राजा मयूरासनावर विराजमान झालेला आहे. आज पहाटेच लालबागच्या राज्याची पारंपारिक पद्धतीने पुजा विधी पार पडली. त्यांनंतर लालबागच्या राज्याचं दर्शन गणेशभक्तांसाठी सुरु करण्यात आलं. तर लालबगच्या राज्याच्या दर्शनासाठी पहाटेच भक्तांनी अलोट गर्दी केलेली होती.

लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून ते आतापर्यंत भाविकांकडून मोठ्या संख्येत गर्दी करण्यात आलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. लालबागच्या राज्याचं देखण रुप याठिकाणी पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राज्यासाठी यंदा मयूर दरबार सजलेला पाहायला मिळत आहे तर मयूर महालात लालबागचा राजा विराजमान झालेला पाहातना बाप्पाचा वेगळाच थाट पाहायला मिळत आहे. यंदा लालबागच्या राज्याचं 91व वर्ष आहे आणि यादरम्यान लालबाग परिसरात अनोखी तयारी मंडळाच्या वतीनं केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com